भरारी....शेतकरी शास्त्रज्ञाची
माणसाला दिवसातून तीन वेळा तरी निदान हवे तेवढे अन्न मिळायला हवे असेल तर त्यासाठी कुणीतरी शेतात राबणे गरजेचे आहे याची जाणीव जगातील काहींना आहे.
असे उन्हातानात शेतीचे एकसुरी काम करायला शेतकयांची नवीन पिढी नाखुष आहे . त्याचे जागतिक अन्न सुरक्षेवरही हया वस्तुस्थितीचा परिणाम होणार आहे.
सर्व जगात शेतकरी जमातीचे प्रश्न एकच आहेत व त्यावर उपाय शोधणारी सरकारी आधिकारी मंडळी शहरात, वातानुकुलीत ऑफिसात बसून निर्णय घेतात हे चित्र सुद्धा जगभरात सारखेच.
इ. स. 2000 साली निर्माण झालेली GFN ही संस्था शेतकऱ्यांचा आवाज आहे. जगभरातील प्रगतशील शेतकरी धुंडून, त्यांच्यातील नेतृत्वाला पैलू पाडून त्यांच्या मार्फत कृषी विकास साधणे, अन्न सुरक्षा गाठणे असे व्यापक ध्येय त्यांचे आहे.
श्री शेखर यांच्या नावे KP.....कृषी पर्यटन, SRT..शून्य मशागत तंत्र, SVT....वणवे संरक्षण ,
SJT .... जलसाठ्यांचे शुद्धीकरण ही
कालसिद्ध संशोधने आहेत.
GFN ह्या संस्थेने श्री शेखर भडसावळे यांची भारतातील प्रगतिशील शेतकरी म्हणून निवड केली.
तंत्रज्ञान, आर्थिक विकास साधण्याच्या विविध वाटा, पीक संरक्षण, पशुधन विकास, माती-पाणी संबंधी नवे विचार, Precision agriculture,
bio fortifications इ. विषयांवर तज्ञांशी चर्चा, विचारांची घुसळण मेक्सिको सिटी येथे 12 ते 17 जानेवारी दरम्यान होणार आहे. श्री शेखर आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व तेथे करणार आहेत.
सौ. अनुराधा चंद्रशेखर भडसावळे.
anu.bhadsavle@gmail.com
Comments