आपले अस्तित्त्व व कर्बाचे स्थिरीकरण
परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या बाबतीत बेडकाची फार छान विज्ञान कथा आहे. समजा एखाद्या बेडकाला अचानक गरम पाण्याच्या टबात टाकले तर तो उडी मारून बाहेर येईल. हो , नाही का? परंतु बेडकाला जर सामान्य तापमानाच्या पाण्याच्या टबात सोडले तर तो तेथेच मजेत राहील.. आता टबातील पाण्याचे तापमान हळूहळू वाढवले तर तो प्रथम थोडा अस्वस्थ होईल . पण बदलत्या तापमानाशी तो जुळवून घेईल. कारण सभोवतालच्या तापमानानुसार शारीरिक तापमान राखणे ही त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. पाण्याचे तापमान वाढता वाढता एक वेळ अशी येईल की त्याला आता पाण्यात राहणेही शक्य होणार नाही. शरीरातील सर्व शक्ती बाह्य बदलाशी जुळवून घेण्यात खर्च झाल्याने जास्त गरम पाण्यातून उडी मारून बाहेर पडण्याचे त्राणही त्याच्यात शिल्लक राहणार नाहीत. तेथेच त्या गरम पाण्यात त्याला आपले प्राण गमवावे लागतील. याला म्हणतात “Boiling frog Syndrome”. खरंतर तो बेडूक व बदलत्या प्रदूषित वातावरणात रुळू लागलेले आपण यात काहीही फारसा फरक नाही. पूर, त्सुनामी, गारपीट, चक्रीवादळे, अवकाळी पाऊस, भूक...