आपले अस्तित्त्व व कर्बाचे स्थिरीकरण
परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या बाबतीत बेडकाची फार छान विज्ञान कथा आहे.
समजा एखाद्या बेडकाला अचानक गरम पाण्याच्या टबात टाकले तर तो उडी मारून बाहेर येईल.
हो , नाही का?
परंतु बेडकाला जर सामान्य तापमानाच्या पाण्याच्या टबात सोडले तर तो तेथेच मजेत राहील..
आता टबातील पाण्याचे तापमान हळूहळू वाढवले तर तो प्रथम थोडा अस्वस्थ होईल . पण बदलत्या तापमानाशी तो जुळवून घेईल. कारण सभोवतालच्या तापमानानुसार शारीरिक तापमान राखणे ही त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे.
पाण्याचे तापमान वाढता वाढता एक वेळ अशी येईल की त्याला आता पाण्यात राहणेही शक्य होणार नाही. शरीरातील सर्व शक्ती बाह्य बदलाशी जुळवून घेण्यात खर्च झाल्याने जास्त गरम पाण्यातून उडी मारून बाहेर पडण्याचे त्राणही त्याच्यात शिल्लक राहणार नाहीत. तेथेच त्या गरम पाण्यात त्याला आपले प्राण गमवावे लागतील.
याला म्हणतात “Boiling frog Syndrome”.
खरंतर तो बेडूक व बदलत्या प्रदूषित वातावरणात रुळू लागलेले आपण यात काहीही फारसा फरक नाही.
पूर, त्सुनामी, गारपीट, चक्रीवादळे, अवकाळी पाऊस, भूकंप ,कडाक्याची थंडी, ओला सुका - दुष्काळ... हे सर्व त्या त्या देशातील - प्रदेशातील बातम्या आहेत असं, मानून “हल्ली, हवामानाने अगदी ताळतंत्र सोडले आहे” असं म्हणून आपण आपल्या कामाला लागतो.
काय संबंध आहे कार्बन डाय-ऑक्साइड व जागतिक तापमानवाढीचा ?
अति अल्प प्रमाणातील कार्बन-डाय-ऑक्साईड गेली लाखो वर्षे वनस्पतींना अन्न निर्मितीसाठी सहाय्यभूत होतो आहे.
ऑक्सिजन व नायट्रोजन ह्या हवेतील अधिक प्रमाणात असलेल्या घटक वायूं पेक्षा एक विशेष गुण CO२ कडे आहे.
ती क्षमता म्हणजे सूर्यप्रकाशा बरोबर आलेली सूर्याची उष्णता ग्रहण करून ठेवण्याची .
वायूमंडलातील CO२, मिथेन इ. ग्रीन हाऊस गॅसेस नसते तर पृथ्वीचे सरासरी तापमान -१८ अंश असते. परंतु, ह्या वायूंच्या आवरणामुळे पृथ्वी सरासरी +१५ अंशाची झाली व जीवसृष्टीसाठी पोषक बनली. पृथ्वीचे तापमान कार्बन डाय-ऑक्साइड वायूच्या वातावरणातील प्रमाणावर अवलंबून असते.
हळू हळू माणूस उद्योगी बनला.
दगडी कोळसा ,पेट्रोलियम पदार्थ ,वाढती वाहने हे वातावरणात विषारी वायूंच्या धुराचे लोट ओतू लागले.
मोठ्या प्रमाणात जंगल तोड झाली. शेतीसाठी लाखो एकर जमिनी ट्रॅक्टरसारख्या यांत्रिकीकरणाने नांगरून तीव्र सूर्यप्रकाशाला सामोर्या जाऊ लागल्या.
जमिनीच्या पोटात लोखो वर्षे स्थिर झालेला कार्बन , सूर्याच्या उष्णतेने , CO 2 च्या स्वरूपात मुक्त होऊ लागला.
अठराव्या शतकात 26 ppm प्रमाणात असणाऱ्या co2 वायूने
आज 2019 साली 408.5 ppm ही पातळी गाठली आहे. मानवासाठी co2 ची रक्षक पातळी 350 पीपीएम एवढी आहे.
मानवी उपदव्यापांनी मुक्त झालेल्या CO 2 नावाच्या भस्मासुराच करायचं काय? कसा त्याला पुन्हा जमीनदोस्त करायचा?
कर्बाचे स्थिरीकरण ( carbon sequestration ) फक्त वनस्पती करू शकतात हे शास्त्रीय सत्य आहे .
झाडांकडे जरा वेगळ्या दृष्टीने पाहूया.
एखादा आंब्याचा डेरेदार वृक्ष सहज 2 ते 3 टनाचा असतो.
“लहानसे रोपटे एवढे मोठे होते कशामुळे? “
“म्हणजे काय , जमिनीतून अन्न-पाणी घेऊन झाड वाढते.”
“बघा बरं, एक घमेले भर माती जमिनीतून काढली तर तिथे तेवढा खड्डा पडतो की नाही?
मग एवढे ३ टनांचे झाड जमिनितील वस्तुमान वापरून मोठे झाले असेल तर किती प्रचंड मोठा खड्डा झाडा शेजारी निर्माण व्हायला हवा होता . पण तसं तर कधीच दिसत नाही.”
हवेमधील विस्कळीत नायट्रोजन,कार्बन डाय-ऑक्साइड ,पाणी व सूर्यप्रकाश यांचा वापर करून घेऊन झाडे वाढतात .
पाने फळे खोड मुळे बिया या इत्यादी स्वरूपात प्रथिने कर्बोदके तयार करतात. झाडे तुटली, तोडली तरी स्वतः च दुरुस्त होतात. मृत झाल्यावर निसर्गात सामावून नव्या जीवांचे जीवन होतात.
खरं म्हणजे अदृश्य हवेपासून झाडे माती तयार करत असतात.
शास्त्र सांगते की झाडे त्यांच्या सुकलेल्या वजनाच्या 50% एवढा कार्बन-डाय-ऑक्साईड स्थिर करत असतात.
झाडांचे वाढणे म्हणजेच कर्बाचे स्थिरीकरण.
शेतकरी बांधव नकळत करोडो टन कार्बन फिक्स करत असतात.
तसेच नकळत, जमिनी नांगरून जमिनीतील कार्बन सुर्यप्रकाशाला सामोरा करून C O2 च्या रुपात मुक्तही करत असतात.
परंतु शून्य मशागत पद्धतीने शेती करणारा शेतकरी एक एकर क्षेत्रात वर्षभर घेतलेल्या पिकांमुळे ९ टन कार्बन डाय ऑक्साईड दरवर्षी स्थिर करत असतो.
कर्बाचे स्थिरीकरणा साठी आपल्याला शक्य असेल तिथे झाडे लावली व वाढवली पाहिजेत. जमीन न नांगरताना पिके लावली पाहिजेत. वाहनांचा उपयोग यथायोग्य गरजेपुरताच करणे आता अपरिहार्य झाले आहे.कोणत्याही स्वरूपात ऊर्जा वाया न घालविणे हे प्रत्येकाने केले तरच आपल्याला शुद्ध हवा श्वासासाठी मिळेल. आपण सगळे मिळून प्रयत्न करू तरच हा बंद बाटलीतून सुटलेला CO 2 च्या राक्षसाचा बंदोबस्त जमिनीत करता येईल.
“मला काय त्याचे” अशा थाटात हवामान बदलाशी जुळवून घेत राहिलो
तर जीव वाचवण्या साठी “बेडूकउडी” मारण्यासही असमर्थ झालेल्या बेडका प्रमाणे आपली गत व्हायला वेळ लागणार नाही.
आता तरी जागे होऊन आपल्या अस्तित्वासाठी स्वतःच्या गरजा कमी करायच्या की “चलता है “म्हणून रेटून न्यायचे. याचा चॉईस आपला आहे.
सौ. अनुराधा चं भडसावळे.
२७ नोव्हेंबर २०१९
https://youtu.be/nvAoZ14cP7Q
https://youtu.be/E__2-w6DI5w

Comments