महान भिंतीची अद्भुत कहाणी
The Great wall of china
जगातले मानवनिर्मित आश्चर्य म्हणून गौरवली गेलेली चीनची *ग्रेट वॉल* इतकी ती उंच आहे की तिथे केबलकारने पोहचावे लागते.
चिनी ड्रॅगन सारखी, दऱ्या खोरे - वाळवंट - पर्वतराजींवर ती ऐसपैस पसरली आहे
म्युटीयांयू वॉल ,महान भिंतीच्या अनेक विभागांपैकी एक हा बिजींगच्या उत्तरेला आहे .
त्या अवाढव्य , प्रशस्त व नेटक्या भिंतीवर निस्तब्ध होऊन तिचे महाकाय रूप व परिसराचे सौंदर्य मनात व डोळ्यात साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत असताना ,
कस्तुरी उद्गारली,
" खरेच ग आई, The Great wall is simply great!
No wonder the whole world admires it!"
मलाही आठवलं, शालेय वयात पर्ल बक ह्या जगप्रसिद्ध लेखिकेची * The Good Earth * ही कादंबरी वाचल्या पासून चीन विषयी आकर्षण होतेच. ग्रेट वॉल वर गेल्यावर मनात विचारांचे मोहोळ उठले.
चीनच्या उत्तरेला संरक्षणासाठी उभारलेली ही तटबंदी आक्रमणे थोपवण्याच्या हेतूने बांधली गेली . सीमा सुरक्षेसाठी जरी ही भिंत बांधली गेली तरीही मंगोलिया, तुर्कस्तान, रशिया येथील राज्यकर्त्यांनी भिंत तोडून चीनवर चढाया केल्याच. मंगोलियाचा क्रूर शासक चेंगिझ खान यानेही ही भिंत ओलांडून चीनवर आक्रमणे केली .
पहिला सम्राट किन शी दुअंग यांनी भिंतीच्या बांधकामाला 2700 वर्षा पूर्वी सुरुवात केली. सात राजघराण्यांनी भिंतीचे बांधकाम चालू ठेवले. व त्याची देखभालही केली. बिजींग येथील भिंतीचा शेवटचा भाग सहाशे वर्षांपूर्वी बांधला गेला.
चिनी भाषेत ग्रेट वॉलला “वान ली छांगछंग " म्हणतात. काळाच्या ओघात आज मितीस २१,१९६ किलोमीटर पैकी २४००किलोमीटर भिंत २१०० वर्षानंतर शाबूत आहे. . मानव निर्मित अशी ही सर्वात मोठी वास्तुशास्त्रीय रचना आहे.
चीनचे राष्ट्रीय प्रतीक व लोकप्रिय पर्यटन स्थळ अशी ही भिंत युनेस्को ने 1987 झाली जागतिक वारसा म्हणून घोषित केलेली आहे
या भिंतीची उंची 4 ते 7 मीटर तर कमाल उंची 14 मीटर पर्यंत आहे. ९. १ मी रुंद आहे. ह्यावरून एकावेळी पाच घोडे दहा लोक पायी जाऊ शकतात.
सामानाच्या वाहतुकीसाठी व दळणवळणासाठी तसेच व्यापारासाठी मार्ग म्हणून सुद्धा उपयोग होतं होता.
ही महाप्रचंड भिंत चंद्रावरून, तसेच अवकाशातून दिसू शकते हे सुप्रसिद्ध मिथक आहे . तशी ती दिसत नाही व दिसणे अशक्य आहे असे शास्त्र सांगते. .
गाईड चांगला असेल तर अनेक गैरसमजुती स्पष्ट होतात. जसे की भिंतीचे बांधकाम चिकट भात व तांदुळाचे पीठ वापरून केले गेले वगैरे. भिंतीचे बांधकाम दगड - विटा - चुना, सिमेंट वापरून केले गेले आहे.
उंचच उंच पर्वतराजींवर , रखरखीत वाळवंटात, मोकळ्या माळरानात ; रणरणते ऊन , कडाक्याची थंडी , घोंगवणारा वारा, वेगवान वादळं, पावसाची रिपरिप त्यामुळे येणारी बोचरी थंडी , अशा आव्हानात्मक हवामानाला तोंड देत काम करताना कित्येक लाख कामगार कामी आले. मृत्यू पावलेल्याना भिंतीतच पुरण्यात आले. त्यामुळे जगातील सर्वात मोठी स्मशानभूमी असेही भिंतीचे वर्णन केले जाते.
प्रभावशाली चीनी लेखक लू झुंन म्हणतात ,
“शक्तिशाली व शापित ग्रेट वॉलवर असंख्य कामगारांना मृत्यूपर्यंत श्रमदान करण्याशिवाय पर्याय नव्हता.”
हिरवे वैभव ल्यायलेल्या भिंतीलगतच्या खोल खोल दऱ्या व दुर्वे पसरलेल्या रोलिंग हिल्स अवर्णनीय सुंदर दिसतात.
एक बाकी नक्की, इथे इतिहास बोलका होतो ! मानवतेला पणाला लावून केलेली बांधकामे , सीमे पलीकडून होणारीआक्रमणे,घोड्यांच्या टापांचे _ त्यांच्या खिंकाळण्याचे आवाज , प्राणपणाने लढल्या गेलेल्या लढाया, घोड्यांच्या - खेचरांच्या पाठीवर लादलेले सामान , व्यापाऱ्यांचे तांडे, पैशांची देवाण -घेवाण ………सगळ्या घटना विचारांच्या कल्लोळाने चित्रपटासारख्या उलगडत जातात .
प्राचीन काळात डोकावून पहाण्याचा, वेगळ्याच जगात फेरफटका मारण्याचा The Great Wall वरील अनुभव अविस्मरणीयच ! .
सौ अनुराधा चं भडसावळे .
ई-मेल: anu.bhadsavle@gmail.com

Comments