लटकणाऱ्या सुंदर फुलांच्या माळांचा गोड्या पाण्याकाठचा वृक्ष: नेवर
लटकणाऱ्या सुंदर फुलांच्या माळांचा गोड्या पाण्याकाठचा वृक्ष: नेवर “ आई, होळीचे रंग संपले नाहीत का इथले अजून?” फिरायला गेलेले असताना तलावावर अचानक थबकून पाण्याच्या काठावरील पृष्ठभागावर झगझगीत लाल - गुलाबी रंगाच्या कार्पेट कडे पाहून माझा नातू आर्चितने , कस्तुरीला विचारले. “ तलावाच्या काठच्या झाडावर लटकणाऱ्या फुलांच्या खूप माळा होत्या का गं ? ....मी “ नाही पाहिलं गं ?” ....कस्तुरी “ब ss रं, मग तिथे तुम्हाला काही वेगळा सुगंध आला का ?”... “हो ना ? मग, नेवर फुललेली दिसतेय”......मी. नेवर/ तिवर ( Barrigtonia acutangula. Family: Lecythidaceae.) म्हणजे गोड्या पाण्याचं मँग्रोव्ह. हा वृक्ष आयुर्वेदाच्या दृष्टीने औषधी आहे. संस्कृत मध्ये हिज्जा तर धात्रिफल किंवा नर्स चे फळ असेही याचे नाव आहे. झाडाची साल, पाने, फळे व मुळे औषधासाठी वापरतात. विशेष: नेवरच्या झाडाची साल मासेमारीसाठी वापरली जाते. सालापासून मासेमारीसाठी...