Posts

Showing posts from March, 2020

आभाळ-फुलांचे विलक्षण झाड

Image
आभाळ-फुलांचे विलक्षण झाड  आज चांदण्यांच्या फुलांचे झाड पाहिलं. आमची लेक टेकडीवर राहते. घराचे नाव वृंदावन. रात्री तिच्या अंगणामध्ये दिवे बंद करून नातवंडं ग्रहांची, आकाशाची ओळख करून घेत होती. तेवढ्यात बकुळीचा चिरपरिचित मंद सुगंध वाऱ्याबरोबर आला. अचानक केतकी म्हणाली, “आई, तुला चांदण्यांचं  झाड पाहायचंय?”  ही कल्पनाच इतकी भारी, मोहक होती, की लगेच ,  " होss चल ना" उत्तर आले. तिच्या अंगणात एक मोठं वेहेळयाचं  ( बेहेडा ) झाड आहे. वेहेळा ( Terminalia bellirica) पानझडी. आत्ता संपूर्ण निष्पर्ण. फुलांच्या आगमनाची पूर्वतयारीच ती. वेहळ्याचं झाड फार  देखण. सरळ, उंच खोडाला  काटकोनात तर जमिनीला समांतर जाणाऱ्या मुख्य फांद्या, त्यांना फुटलेल्या लहान लहान उपफांद्या ,…. त्यांच्या टोकाशी टरारलेल्या कळ्या... ! काहीतरी छान पाहायला मिळणार आहे ह्याची कल्पना आल्याने मुलं नातवंडांचे कान टवकारले.  कोरोनाच्या लॉक डाऊन मुळे रस्ताही वाहता नव्हता. कशाही निमित्त भोंगे वाजत नव्हते. नुसती  निखळ शांतता. खेड्यात, शिवाय उंचावर असल्याने प्रकाशाचे प्रदूषणही नव्हते. विनायकी चतुर्थीची...

पृथ्वी : एक महाकाय सजीव

Image
पृथ्वी  :  एक महाकाय सजीव आपली पृथ्वी हा सुर्यमालेमधला सूर्यापासून तिसरा ग्रह. पृथ्वीच्या अलीकडचे बुध व शुक्र  सूर्याच्या जवळ असल्याने अतिशय तप्त … अनुक्रमे सरासरी  167 व  462 डिग्री से. तापमानाचे.  पृथ्वीच्या पलिकडचे गुरु, शनी पासून प्लूटो पर्यंतचे सहा ग्रह अत्यंत शीत: सरासरी   - 110 ते  - 225 डिग्री सेल्सिअस राखणारे.  खरे तर पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर पाहता तिचे सरासरी तापमान  53 डिग्री से. असायला हवे होते. पण प्रत्यक्षात ते 13 डिग्री से. सरासरी आहे.   पृथ्वी हा ग्रह सजीवांच्या  जीवनासाठी परिपूर्ण आहे ; हा योगायोग असूच  शकत नाही असे ब्रिटिश शास्त्रज्ञ प्रो. जेम्स  लव्हलॉक  यांना अमेरिकेतील नासा संस्थेमध्ये मंगळावरील वातावरणाचा जीवसृष्टी संदर्भात अभ्यास करताना जाणवले.  सखोल अभ्यास व संशोधनानंतर पृथ्वी ही एक महाकाय सजीव असल्या  विषयीची  गाया  संकल्पना त्यांनी 1970 च्या दशकात  मांडली. गाया ही  ग्रीकांची भू देवता.  गाया संकल्पनेनुसार ,  “ पृथ्वीवरच्या सर्व सजीवांची...

इको ब्रिकस्: महिला फिनच्या निमित्ताने आपण हे करूया का?

Image
महिला दिनाच्या निमित्ताने एक कल्पना शेअर करायची आहे. फार सोप्पी आणि सहज जमण्यासारखी आहे सगळ्यांना. आपण स्त्रिया नेहमी अष्टभुजे प्रमाणे Multi tasking  करत राहतो." सुपर वूमन सिमड्रोम " ने  पछाडलेले असतो म्हणाना . त्यातल्या पैकीच एक चुटकी सरशी करता येण्यासारखी एक ' Eco friendly ' ऍक्टिव्हिटी आहे. भयपटात दाखवल्या सारखे , प्लॅटिक जमीन, नद्या- नाले, महासगरांना दर क्षणाला पादाक्रांत करताना आपण ऐकतोय, चकित होऊन पहातोय.  आपला जास्त संबंध येतो प्लास्टिक पिशव्या व  खाऊच्या रॅपरशी . आकारमानाने मोठे पण वजनाने नगण्य असे हे 'महाभूत'  बिसलेरी किंवा तत्सम बाटलीत अगदी सहज बंद होते. इतकेच नाही तर त्यापासून उत्तमोत्तम वस्तूही तयार करता येतात. हा  विषय मला माझ्या लेकीने पटवून दिला.  ही नवीन idea  आहे.’ इको ब्रिक ' किंवा ' पर्यावरण स्नेही विटा ’  तयार करणेची . बिसलेरी किंवा कोणत्याही  प्लास्टिकच्या बाटली मध्ये दिवसभरात निर्माण होणारे सर्व प्लास्टिकचे तुकडे, पिशव्या ठासुन भरायचे. साधारण आठवडा पंधरवड्याने  ती बाटली विटे सारखे मजबूत, घट्ट बनते. अशा अनेक बाट...