इको ब्रिकस्: महिला फिनच्या निमित्ताने आपण हे करूया का?
महिला दिनाच्या निमित्ताने एक कल्पना शेअर करायची आहे. फार सोप्पी आणि सहज जमण्यासारखी आहे सगळ्यांना.
आपण स्त्रिया नेहमी अष्टभुजे प्रमाणे Multi tasking करत राहतो." सुपर वूमन सिमड्रोम " ने पछाडलेले असतो म्हणाना . त्यातल्या पैकीच एक चुटकी सरशी करता येण्यासारखी एक
' Eco friendly ' ऍक्टिव्हिटी आहे.
भयपटात दाखवल्या सारखे , प्लॅटिक जमीन, नद्या- नाले, महासगरांना दर क्षणाला पादाक्रांत करताना आपण ऐकतोय, चकित होऊन पहातोय.
आपला जास्त संबंध येतो प्लास्टिक पिशव्या व
खाऊच्या रॅपरशी . आकारमानाने मोठे पण वजनाने नगण्य असे हे 'महाभूत' बिसलेरी किंवा तत्सम बाटलीत
अगदी सहज बंद होते. इतकेच नाही तर त्यापासून उत्तमोत्तम वस्तूही तयार करता येतात. हा विषय मला माझ्या लेकीने पटवून दिला.
ही नवीन idea आहे.’ इको ब्रिक ' किंवा ' पर्यावरण स्नेही विटा ’ तयार करणेची .
बिसलेरी किंवा कोणत्याही प्लास्टिकच्या बाटली मध्ये दिवसभरात निर्माण होणारे सर्व प्लास्टिकचे तुकडे, पिशव्या ठासुन भरायचे. साधारण आठवडा पंधरवड्याने ती बाटली विटे सारखे मजबूत, घट्ट बनते. अशा अनेक बाटल्यांचा उपयोग करून स्टूल, लहान पूल वगैरे तयार करतात. त्यायोगे खूप सारे इतस्ततः पडणारे प्लास्टिक एका ठिकाणी जमा होते.मुलेही साक्षोपाने खाऊचे रंगीत, चकचकीत रॅपर बाटलीत आणून भरतात.
आपल्या सर्वांच्या प्लॅटिक जमा करण्याच्या मोहिमेच्या लहानशा कृतीने पर्यावरणात नक्की खूप फरक पडणार आहे!
आपल्या सामूहिक प्रयत्नांनी परिसर सुंदर होईलच पण त्या बरोबरच निसर्गातले दृश्य, अदृश्य जीवजंतू, पक्षी, प्राणी व झाडे सुद्धा प्रसन्न होऊन आशीर्वाद देतील तो फायदा वेगळाच.
चला तर मग, प्लास्टिकच्या अवाढव्य समस्स्येची व्याप्ती कमी करण्यासाठी आपण सर्वजणी / सर्वजण महिला दिनी कटिबद्ध होऊया ना?
अनुराधा चंद्रशेखर भडसावळे.
https://www.ecobricks.org/
Comments