* खरेच का शरीर, जणू आत्म्याचे माध्यम आहे ? *
पर्यावरणा विषयी जाणून घेता घेता *मी व माझे शरीर* ह्या विषयीही कुतूहल होतेच. हे अर्जुना, *शरीराचे अस्तित्व केवळ काल्पनिक असून ते आत्म्याला प्रकट करण्याचे माध्यम आहे. * शरीराची वास्तविक सत्ता मानली जात नाही. भगवंत अर्जुनाला, युद्धामुळे आगामी होणाऱ्या मानवी विनाशाने वृथा शोकाकुल होऊ नकोस असा उपदेश करताना निक्षून सांगतात. मला तरी भ. श्रीकृष्ण।नी सांगितलेले, * शरीर हे , आत्म्याचे माध्यम * संकल्पना म्हणून कळायची पण अनुभव नसल्याने वळायची नाही. अनेक साधू संतांना हा अनुभव आलेला आहे. महर्षी रमण यांना तर वयाच्या आठव्या वर्षीच आला. अनुभव घेऊन समजून घेण्याची फार इच्छा होती. अनेक प्रश्न पडत होते.. आत्मा वेगळेपणाने कळायला हवा ना? तो कसा कळणार? त्याचे अस्तित्व कसे जाणून घ्यायचे? त्या दृष्टीने व्यवहारातील उदाहरणांचा शोध मनात चालू होता. या पाठदुखीच्या ट्रीटमेंट साठी माझ्या Physio therapist कडे गेले होते. Swan position फार अवघड. पालथे पडून कंबरे पासून पुढचे शरीर उचलायचे ...... ...