* खरेच का शरीर, जणू आत्म्याचे माध्यम आहे ? *
पर्यावरणा विषयी जाणून घेता घेता *मी व माझे शरीर* ह्या विषयीही कुतूहल होतेच.
हे अर्जुना,
*शरीराचे अस्तित्व केवळ काल्पनिक असून ते आत्म्याला प्रकट करण्याचे माध्यम आहे. * शरीराची वास्तविक सत्ता मानली जात नाही.
भगवंत अर्जुनाला, युद्धामुळे आगामी होणाऱ्या मानवी विनाशाने वृथा शोकाकुल होऊ नकोस असा उपदेश करताना निक्षून सांगतात.
मला तरी भ. श्रीकृष्ण।नी सांगितलेले,
* शरीर हे , आत्म्याचे माध्यम * संकल्पना म्हणून कळायची पण अनुभव नसल्याने वळायची नाही.
अनेक साधू संतांना हा अनुभव आलेला आहे. महर्षी रमण यांना तर वयाच्या आठव्या वर्षीच आला.
अनुभव घेऊन समजून घेण्याची फार इच्छा होती. अनेक प्रश्न पडत होते.. आत्मा वेगळेपणाने कळायला हवा ना? तो कसा कळणार? त्याचे अस्तित्व कसे जाणून घ्यायचे?
त्या दृष्टीने व्यवहारातील उदाहरणांचा शोध मनात चालू होता.
या पाठदुखीच्या ट्रीटमेंट साठी माझ्या
Physio therapist कडे गेले होते. Swan position फार अवघड. पालथे पडून कंबरे पासून पुढचे शरीर उचलायचे ...... खूप प्रयत्न करूनही जमत नव्हते.
" नाही होणार माझ्याच्याने"
ती म्हणाली,
" जमत कसे नाही?
शरीराला वर यायला सांगा. ...
शरीर आपण सांगू ते ऐकतच...
तुम्ही सांगता तस्से शरीर करते...
तुम्ही तुमच्या शरीराशी बोलायला हवे ... त्याला निक्षून सांगायला हवे......."
आणि काय आश्चर्य,
पाच मिनिटांपूर्वी हताशपणे,
"हे व्यायाम फार अवघड आहेत
मला नाही जमणार" असे
म्हणणारी मी, एक एक करून सर्व कसरती करू शकले.
आणि मनात लक्ख प्रकाश पडला..
अरे, खरेच की...
मी माझ्या शरीरा पेक्षा वेगळी असली पाहिजे....
हेच चैतन्य असले पाहिजे ...
म्हणून तर माझे म्हणणे माझ्या नाठाळ शरीराने ऐकले!!!
दृष्टांत बघा तुम्हाला पटला आहे का?
तुम्हाला असे कधी, शरीराचे माझ्यापेक्षा *वेगळेपण* जाणवले असेल तर तो अनुभव शेअर करा जरूर 😊
सौ. अनुराधा चंद्रशेखर भडसावळे
anu.bhadsavle@gmail.com
Comments