फरक पडतो.......
*अमेरिका * बहुतेकांच्या जिव्हाळ्याचा देश. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात जगप्रसिद्ध असे योसेमाईट राष्ट्रीय वन आहे. देशी विदेशी पर्यटकांना भुरळ पडणारी ही जागा आहे. ओक, सिडार, बर्च, डॉगवूड, मेपल, रेडवूड, पाईन अशा सारख्या अनेक प्रकारच्या वृक्षांची दाट गजबजलेली वस्ती तेथे आहे. त्यामुळे जैवविविधतेने नटलेलेअतिशय समृद्ध जंगलच तयार झाले आहे. तिथे झाडांखाली फळांचा, ज्याला कोन म्हणतात, त्यांचा खच पडलेला असतो. पर्यटनासाठी कुठे फिरायला गेलं की तिथली आठवण म्हणून काही सुवेनिअर आणले जाते. एक पर्यटकाला योसेमिटीला गेल्यावर असं वाटले, केवढे कोन खाली पडलेत; एखादा कोन आठवण म्हणून घरी न्यावा. ...........आणि.......... त्याने खाली वाकून फळ उचलले मात्र, तेथील कर्तव्यदक्ष वनरक्षक लगेच हजर झाला !! अदबीने परंतु जरबेने त्याने विचारले, " हॅलो मिस्टर ! आपल्याला हा कोन आवडला का ?" "हो तर. आमच्या कडे अशी झाडे नाहीत त्यामुळे ह्या फळाचे अप्रूप वाटले. घेतला तर चालेल ना ?" " कसे आहे की ह्या प्रसिद्ध पर्यटन स्थळी चार ते पाच दशलक्ष पर्यटक दरवर्षी भेट देतात. प्रत्येकाने जरी फक्त ...