वादळ - वादळं
"तात्या, तीन दिवस झाले लाईट नाहीत, दुरुस्तीचे काम चाललंय की नाही ?"
"यंदा वारा फार. लाईनमन कंटाळले वहिनी सारख्या झाडांच्या फांद्या तोडून तोडून ”
आमचा इलेक्ट्रिशियन तात्या सांगत होता.
वादळात बाग सापडली की आंबा, फणस, वड, उंबर, मोह यासारखे मोठमोठे वृक्ष सुद्धा आपला प्रचंड डोलारा घेऊन घुसळताना, मोडताना व उन्मळून पडताना पाहून, निसर्गाच्या एरवी सुप्त असलेल्या शक्तीचा अनुभव येऊ लागतो.
वादळं म्हणजे प्रचंड ऊर्जेची महाप्रचंड हालचाल. कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले की हमखास निर्माण होतात, झंझावाताने अवतरतात.
अशी ही वादळं मनातही उसळतात. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यात शरीरात व मनात उठलेली वादळं आपण पाहतो, अनुभवतो . शरीर मनाचं एवढं घट्ट नातं आहे की मनातली वादळ शरीरालाही वेठीला धरतात .
व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती भोवतालीच नेहमी आपलं मन घोटाळत राहतं. भूतकाळात, वा भविष्यात फेर धरून घुमणारी ही मानसिक वादळ वेळेत शमली तर बरे नाहीतर रक्तदाब, डिप्रेशन, आँगझायटी , ऍसिडिटी , छातीत धडधड, अशा वेगवेगळ्या शारीरिक समस्या येतात ना?
खरंतर ह्या वादळांना तोंडच द्यावे लागते. होणारी उलथापालथ सोसावी लागते आणि त्यातून नव्या आयुष्यासाठी जिद्दीने, उमेदीने उभे राहणे हेच अपेक्षित असते ना? झालेल्या नुकसानाकडे नव्या उभारणीची संधी असे पाहिले तर सगळे सोपे होऊन जाते.
थॉमस अल्वा एडिसन 67 वर्षांचा असताना त्यांच्या कारखान्याला आग लागली. आयुष्यभराचे परिश्रम व लक्षावधी डॉलरची मालमत्ता जळून खाक होत असताना वृध्द एडिसन उद्गारले,
" विनाश सुद्धा मोठा मौल्यवान असतो. त्यात आपल्या सर्व चुका जळून जातात. आता पुनः नव्याने सुरुवात करता येईल. त्याबद्दल देवाचे आभार मानले पाहिजेत."
खरे तर वादळं पूर्वसूचना देत असतात. मानसिक आंदोलनात आपण संवेदनशील राहूंन येणाऱ्या सुचनांचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला, कमी - अधिक दाबाचे पट्टे मनात नाही होऊ दिले तर वादळांचा फटका कमी होणे शक्य होईल हे नक्की.
अनुराधा चं भडसावळे.

Comments