ट्रॅफीक जॅम
आ sss ऊ आ sss ऊ आ sss ऊ आ sss ऊ असा अँबुलन्सचा लक्षवेधी आवाज ऐकल्यावर
सागरला म्हटले,
“ आपली गाडी बाजूला घेऊन इमर्जन्सी पेशंट साठी रस्ता करून देऊयात रे “
“ कुठे घेऊ वहिनी ? जागा कुठेय हलायला ?”
बाहेर पाहिले तर रस्त्यावर
मोठाले ट्रक, शाळेच्या बसेस, कार, कचरा नेणारे डंपर, कोंबड्या वाहून नेणारे टेम्पो, रिक्षा, गाड्यांच्या मधील दोन अडीच फुटांच्या फटी फटीतून कुशलतेने गाड्या काढणारे मोटरसायकलस्वार ,अंग चोरून चालणारे पादचारी, फ़ुलं – खेळणी विकणारे विक्रेते …….सर्वत्र नुसती गजबज . !!!!
नजर जाईल तिथे खड्डे, काही मोठे तर काही छोटे, अर्धवट झालेले रस्ते, पूर्ण झालेल्या रस्त्याच्या कडेला खडी, खरवडलेल्या डांबराचे ढीग, पांढऱ्या अर्धवट फाटलेल्या पोत्यात काहीबाही भरलेले समान, कसलातरी राडा रोडा, वेडेवाकडे पसरलेले पेव्हर ब्लॉक्स आणि काही अशा अनावश्यक बाबींची अडगळ….
“कसे हे असे दरवर्षी हमखास खराब होणारे रस्ते करतात?”
“का लोकं रस्त्यात गाड्या पार्किंग करून निघून जातात?”
“कुणाला कधी शिक्षा होते की नाही?”
“किती इंधन वाया जातेय अन प्रदूषण होते ते वेगळेच “
“शिवाय वेळ वाया जातो त्याचे काय? “
*वेळ वाया जातो*………… …………..मन खडबडून जागे झाले.
……… " तू करणार आहेस का या प्रश्नांचा पाठपुरावा ? मग थांबव ही अनुत्पादक विचार शृंखला."
खरेच, नाराजीची कारणे शोधण्यापेक्षा मी मला मिळालेल्या वेळाच्या देणगीचा कसा उपयोग करू शकते ?
खूपच दिवसांपासून मामांना फोन करायचा होता.
“अग, बरं झालं तू फोन केलास. आजींनी लिहिलेल्या वह्या मिळाल्यात. त्यावर काम करतोय. वेळ कसा जातो समजतही नाही. आहेत प्रकृतीच्या थोड्या कुरबुरी दोघानंच्याही पण तुझ्याशी बोलून फार छान वाटले बघ. आणि हो ,वेळ घेऊन। फोन केलास ते बरे केलेस. आताशा बोलायला वेळ असतो कुणाकडे ?”
चार वेळा फोन केल्यावर
“ हॅलो, कोण बोलतय? “ नाव दिसत असूनही मावशीचा प्रश्न!
मग मात्र ती , जी बोलू लागली…….. मुली, नातवंडे, जावई, उन्हाळा, पाण्याची टंचाई, प्रकृतीच्या कुरबुरी…
“अस्स, हो का ? , बरं बरं , वा वा “ ह्या पलीकडे मला काही बोलायची गरजच नव्हती.
“हे बघ, तू माझ्याकडे चार दिवस माहेरपणाला ये कशी . अगदी तुझ्या आई सारखे करून घालते बघ . कधी येतेस? नक्की ये हो !”
गम्मत वाटली. ऐशीच्या घरातील मावशी साठीतील मला आग्रहाने माहेरपणाला बोलवत होती……….....
ट्रॅफीक जॅम मुळे नाती उजळायला मिळाली.
* माझा आनंद मीच संभाळू शकते* चा प्रत्ययही आला।
अनुराधा चं भडसावळे.

Comments