व्हायचे आहे का अश्वत्थामा ?
आत्तापर्यंत कडेवर बसून फुलपाखरे व पक्षी बघून खुष होऊन टाळ्या पिटणारी आमची नात मंदिरापाशी खाली उतरते . मंदिर तळ्यात आहे. सगुणा बागेतील ह्या तळ्यात नदीतील माशांना ब्रीडिंग साठी संरक्षित जागा उपलब्ध करून दिली आहे.
देवाच्या दर्शनाला पाण्यातून जावे लागते. पाण्यात पॅन्ट गुडघ्यापर्यंत वर खेचून खाली वाकून, बसून तिचे निरीक्षण सुरू होते. एकाएकी दिसू लागणारे लहान मासे पाहून खुश होते.
मे महिन्यात एवढे मासे दिसत नाहीत तळ्यात.
"आज्जी , कित्ती मासे आहेत !
शाळेत चालले बघ !"
मोठ्ठले डोळे विस्फारून ते कौतुक पहात रहाते.
दोन महिन्यांनी, पायापाशी घुटमळणारे माशांचे थवे दिसेनासे होतात.
" आssहो आबा , आज मासे कुठे गेले ? "
"आज कुणीच नाही आले ?"
हिरमुसली होऊन तिची नजर पाण्यातील पोहणाऱ्या मित्रांना शोधू लागते.
मी,
"का हो? कुठे गुडप झाले माशांचे थवे?
आणि आताशा मासे कमी मिळतात असे नदीवर *रात्रीच्या भाजीला * जाळे घेऊन जाणारे लोक म्हणत होते . खरे का ?"
शेखर ,
"अग, वळघणीत माश्यांनी पिल्ले दिली. ती दोन महिन्यात वाढली . सध्या उत्तरा नक्षत्र आहे आणि काल मोठा पाऊसही झाला. मासे उतरले असतील प्रवाहा बरोबर नदीत ."
नदी, खाडी, सुमुद्रातून माशांचा प्रजननासाठी प्रवास चालूच असतो.
आपण *सामन * ह्या माशांच्या विषयी ऐकून, पाहून असतो . हे समुद्रात राहणारे मासे प्रजननासाठी हजारो किलोमीटर प्रवाहा विरुद्ध प्रवास करतात. गोड्या पाण्याच्या ज्या खळखळत्या ओहळात त्यांचा जन्म झाला असतो त्याच ठिकाणी ते परततात . निसर्गाने सोपविलेले वंश सातत्याचे काम झाले की ते मृत्यूपंथाला लागतात. फारच थोडे मासे समुद्रात परतू शकतात .
पाश्चिमात्य लोकं कोणत्याही विषेश नैसर्गिक घटनांचा सर्वांगीण विस्तृत अभ्यास करतात, त्या विषयी लिहितात, डॉक्युमेंटरी बनवतात. कायदे करतात, कायदे पाळणे अनिवार्य करतात. जनजागृती करतात. त्या
नैसर्गिक बाबीला संरक्षणही देतात.
आपल्याकडेही असा माशांचा प्रजननासाठी प्रवास दरवर्षी पावसाळ्यात चालू असतो. जून महिन्यात पहिल्या पुरात, जेव्हा नदीचे पाणी गढूळ असते, जोरात फोफावत वाहत असते, त्यावेळी प्रजननक्षम मासे नदीतून प्रवाहा विरुद्ध प्रवास करून ऊथळ शेतात, नाल्यात , माळावर चढतात ह्यालाच * वळघण * म्हणतात.
वाव , शिंगट्या शिवडा, वालांजी , डाकू , दांडवणी ,मुरी , खऊल , टोका, घोडा मासा , कानोसा , चिम्बोऱ्या , खेकड , कासवे , आरल ,क।ळाचिवणा, वारीस इ. प्रकारचे मासे वळघणीच्या वेळी शेतात चढतात.
पावसाळ्याच्या तोंडावर मादी मंदावलेली, जडावलेली असते. एक कीलो वजनाची मादी सुमारे एक ते दीड लाख अंडी सांभाळून असते. अंडी सोडायला ती आतुर झालेली असते .
गवतावर पोट घासून मादी अंडी सोडते. नर निसर्गाने नेमून दिलेले फलनाचे काम करतात.
आता माणसाच्या हावरेपणाचा धिंगाणा पहा...
नदीत मासे का कमी मिळतात ह्या विषयीची जळजळीत वस्तुस्थिती ...
माशांची वळघण कधी लागणार हे आजूबाजूच्या गावात मागील अनुभवाने माहीती असते. बहुतेक सगळ्या घरांमध्ये वळघणीच्या माशांना मारण्यासाठी, चार टोके असलेला चारखंड, तलवारी सारखी पट्टी, भाला , जाळे : पाग, गील नेट इ. वस्तू जपून ठेवलेल्या असतात.
उथळ जमिनीवर आलेल्या, प्रजननासाठी वेड्या झालेल्या , बेसावध माशांची शिकार मांणसे झुंडीने करतात . मादीने अंडी सोडायच्या आगोदर तिला मारायची किंवा पकडायची घाई असते . तिच्या पोटातली गोभोळी म्हणजेच अंडी फार चविष्ट असतात ना! कित्येक ....कित्येक मोठे झालेले मासे मारले जातात ह्या रात्री.
तरीही शेकडो फलित अंडी गवताला धरून राहतात. पाण्यात फुगतात . भिजलेल्या साबुदाण्या एवढी होतात . परिस्थितीनुसार दोन ते सात दिवसात त्यातून पिल्ले बाहेर पडतात.
पावसाळ्याचे साधारण अडीच ते तीन महिने पिल्ले शेतात , माळावर, तळ्यात राहतात. मोठी होतात. मग त्यांना * स्वगृही * परतायची घाई होते.
नदीत परतायला आतुर झालेल्या पिल्लांसाठी पाऊस धाऊन येतो. उत्तरा नक्षत्रात मोठा पूर येतो आणि प्रवाह बरोबर हे लहान मासे पटापट, मार्गावरच्या अडथळ्यांना , प्रसंगी उड्या मारून पार करून नदीत उतरतात.
परतायला आधीर झालेल्या माशांना घोरपडी , मुंगूस, यासारखे प्राणी तर बलई, आयबीस, इ. सारखे पक्षी टिपून खातात. माणूस तर टपून बसलेला असतोच . तो भोकशी किंवा सापळा लावतो . ज्या ओहळातुन मासे जातात त्याला सापळा लावतात . उरले सुरले मासेही स्वाssहा होतात.
शिकरीलाही काही नियम असायला हवेत ना?
मासे हे पौष्टीक व परिपूर्ण अन्न आहे. लक्षावधी लोकांच्या उपजीविकेचे साधन आहे. पण अशा रीतीने त्यांची शिकार झाल्यामुळेच, पैदासच न झाल्याने माश्यांची संख्या कमी झाली आहे. गाभण मासे पकडणारे फक्त दोषी नाहीत तर दुसऱ्या दिवशी वाट्टेल ती किंमत देऊन गाभोळी विकत घेणारेही त्या पापात सहभागी आहेत. माश्यांची अंडी विकत न घेणे हे तर आपण करू शकतो?
आज तर नर आणि मादीला प्रजोत्पादना आगोदरच नदीतच शॉक देऊन मारले जाते
असे संतोषदा , कमलकरदादा व बारकूदा ,
यांनी वळघणीच्या विषयी माहिती देताना
उद्वेगाने सांगितले.
गर्भिणीला अथवा तिच्या गर्भाला मारणे हा प्रमाद आहे . असे दुष्कृत्य अश्वत्थाम्याने केले होते.
महाभारत युद्धात अश्वत्थाम्याने पाचही पांडवपुत्रांचीच ते झोपेत असताना हत्या केली . संतप्त अर्जुन व अश्वत्थाम्याने एकमेकांवर ब्रह्मास्त्र फेकली. सृष्टीचा विनाश होऊ नये म्हणून कृष्णाने दोघांना आपापले ब्रह्मास्त्र परत घ्यायला सांगितली . परंतु अश्वत्थाम्याला अस्त्र परत घेण्याची कला माहीत नसल्यामुळे त्याने अभिमन्यूची पत्नी उत्तरेच्या गर्भावर ते सोडले.
यावर क्रोधित होऊन कृष्णाने त्याच्या कपाळावरचा दिव्य मणी काढून घेतला आणि त्याला शाप दिला की कल्पकल्पांतापर्यंत ही जखम कपाळी घेऊन, तू जखमेवर लावण्यासाठी तेल मागत दारोदार फिरशील.
भगवंताने त्याला चिरंजीवित्वाचा शाप दिला.
हाव व आक्रमकता ह्यामुळे निसर्गचक्राच्या
जैविक जलस्रोतांचा तोल डळमळीत करणाऱ्या मानवालाही अशी भळभळणारी जखम कायम वागवावी लागणार आहे की कसे आहे हे काळच ठरवेल.
सौ .अनुराधा चं भडसावळे
See the video
https://youtu.be/ZR4_LhPCgbo

Comments