महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन महासंघ सहकारी मर्यादित. ( MART )

मार्ट ह्या संस्थेने सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने काल कृषिरत्न श्री. चंद्रशेखर भडसावळे यांस " कृषी पर्यटनाचे जनक "
Father of Agrotourism ह्या सन्मानाने विभूषित केले.

प्रवास सगुणा बागेचा

सगुणाबागेत कृषी पर्यटन 1985 पासून सुरू झाले . खरे तर कृषी पर्यटन ह्या शब्दाचा जन्मही इथेच झाला. 
    
साप बघायला येणाऱ्या काही पाहुण्यांनी, " आम्ही इथे दिवसभर राहू का? 
जेवायची सोय होईल  का? "
असे विचारल्यावर, " हो, नक्की " 
असे सांगून साधीशीच सोय मनापासून आपुलकीने केली.

इथली झाडे तोवर डेरेदार होऊ लागली होती. शेतात पिके होती. तलावांमुळे गारवा व सौंदर्यीकरण झाले होते. निसर्ग, शेती विषयी माहिती शेखर आनंदाने देत   होते. आमचे संपूर्ण कुटुंब व सहकारी आलेल्या पाहुण्यांचा," आपले घरचे / माहेरचे पाहुणे" मानून पाहुणचार करायला तत्पर होते.

बोल बोल म्हणता सगुणा बागेने   
 "अतिथी देवो भव " ह्या तत्वाचा अंगीकार करून पाहुण्यांच्या मनात स्थान पटकावले. 
शेतक्ऱ्याला प्रतिष्ठा मिळवून देणारी अशी केंद्रे इतर शेतकऱ्यांनीही सुरू करावीत म्हणून त्यांचे प्रयत्न सुरू झाले. 
आकाराने छोटे पण स्वानुभवामुळे  
आशय महान असणारे

" कृषी पर्यटन" ग्रामीण जीवनातील आत्मसन्मान व उन्नतीचा महामार्ग "

 हे पुस्तक त्यांनी लिहिले. अनेकांना त्यापासून प्रेरणा मिळाली व मिळत आहे.

सगुणाबागेत पाळली जाणारी तत्वे:

१. आलेला पाहुणा  मित्र बनून जावा" 

2. " इथले वातावरणच इतके भान विसरायला लावणारे आहे की दारू सारख्या मादक द्रव्यांची तुम्हाला गरजच भासणार नाही....अशी खात्री देणे .
 थोडक्यात, 
"No alcoholic drinks please"

3. अनोळखी पाहुण्यांची उठबस मनापासून करणे.

ह्या तत्वांचे पालन सगुणा बागेच्या परिवाराने कटाक्षाने केल्याने केंद्राचे 
नाव परिसरात चांगले होतं गेले.

     आज आम्ही, शेखर भडसावळे कुटुंबीय तसेच सगुणाबागेचा परिवार अगदी प्रथम आलेल्या;  नंतर आलेल्या व सातत्याने नेहमी येणाऱ्या व पुढे येऊ इच्छिणाऱ्या पाहुण्यांचे आभार मानतो आहोत. धन्यवाद.

सौ अनुराधा चंद्रशेखर भडसावळे.
anu.bhadsavle@gmail.com

Comments

हार्दिक अभिनन्दन...तुम्हा सर्व कुटूंबियांचे ...

Popular posts from this blog

मदनबाण

जलाशयांना विळखा जलपर्णीचा! इलाज सगुणा जलसंवर्धन तंत्राचा ( SJT )!!

वैशिष्ठयपूर्ण नाते : कमळ पुष्प व समृद्धी यांचे. भाग 1