Posts

Showing posts from February, 2020

दरवळला परिमळ सारा

Image
खरंतर फार वाजले नव्हते. पण सूर्य कलला होता. काळोख दाटू लागला होता. पक्ष्यांचा आपल्या  घरट्यांकडे परतीचा प्रवास सुरु झाला होता.   संध्याकाळी उशिरा  नदीवरून घाईने परतताना घराजवळ अचानक पावलं थबकली.   आसमंतात सर्वदूर मंद, मोहक, सुगंधाची पखरण झाली होती. गुलाब, जाई, जुई, मोगरा, सोनटक्का, चाफा, बूच, बकुळ  ह्यांपेक्षा वेगळा, अलवार सुगंध …… मन घरी ओढ घेत होतं, पण पाय मात्र जागचे हलायला तयार नव्हते ह्या लपलेल्या सुवसाला कुठे शोधू असं होऊन गेलं. आजी ssss आजीssssss ग!  थांबायचे का आपल्याला 'पपम' जवळ? पपम..... पपनसाचे नाव आभाने काढल्याबरोबर सुगंधाचे कोडे उलगडले. झाड दिसत नव्हते पण सुगंध आपली ओळख सांगत होता. पपनस फुलावर आलाय वाटतं!!! हिवाळ्याचे उत्तरार्धात वातावरण थंड पण कोरडे असते. यावेळी पपनस फुलतात..... हो तेच ते फळ जे  गणपती घरी आले की वाट्टेल ती किंमत देऊन बाप्पासाठी घेऊन येतो. हे झाड मूळचे मलेशियातील. भारतात चांगले रुळले. चुरल्यावर प्रसन्न सुगंध येणारी गर्द हिरवी गोल मोठी पाने... . पांढऱ्या रंगाचे, मंद सुगंधी फुलांचे घो...

सुख आणि सौख्य

माझी चिमुरडी नात आहे दोन वर्षांची . फार गोड  आहे.  तिला लपाछपी, पकडपकडी खेळायची असते. पुस्तकातील चित्रे जाणून घ्यायची असतात. वही पेन घेऊन अभ्यास करायचा असतो. देवाची पूजाही बरोबरीने करायची असते. जमिनीवर बसले असता पाठीमागून तिची बाळमिठी गळ्याला बसली की मन आनंदाने भरून येते. सुख सुख म्हणतात ते म्हणजे हेच असं वाटत असतानाच..…...आई, बाबा, आबा पैकी कुणी बाहेर निघाले की हिची मिठी लगेच सुटते.  " मना पन ने ना।    मना यायचंय   "  म्हणत  आपले बूट शोधू लागते. क्षणा पूर्वी सुखसागरात विहार करणारे मन म्हणू लागले........... जागी हो बाई , जागी हो .  लक्षात आलं की हा अनुभव फक्त माझा नाहीय.   तीन चार महिन्यांच्या बाळालाही  आईच्या उबदार कुशीतूनही  " भुर्रर्रर्र " ची ओढ असतेच.  आपले सुखाचे स्वरूप बदलतेच राहते! समर्थ निक्षून सांगताहेत..... विषय जनीत सुखे सौख्य होणार नाही. काय आहे सुख ?  शब्द स्पर्शादी विषयां पासून तात्पुरते मिळालेले  ते सुख . पण त्याच्या भ्रमंतीत शीण आहे. सौख्य ... विषयांशिवाय  माझ्यातच मला सापडलेले कायम...

महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन महासंघ सहकारी मर्यादित. ( MART )

मार्ट ह्या संस्थेने सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने काल कृषिरत्न श्री. चंद्रशेखर भडसावळे यांस " कृषी पर्यटनाचे जनक " Father of Agrotourism ह्या सन्मानाने विभूषित केले. प्रवास सगुणा बागेचा सगुणाबागेत कृषी पर्यटन 1985 पासून सुरू झाले . खरे तर कृषी पर्यटन ह्या शब्दाचा जन्मही इथेच झाला.       साप बघायला येणाऱ्या काही पाहुण्यांनी, " आम्ही इथे दिवसभर राहू का?  जेवायची सोय होईल  का? " असे विचारल्यावर, " हो, नक्की "  असे सांगून साधीशीच सोय मनापासून आपुलकीने केली. इथली झाडे तोवर डेरेदार होऊ लागली होती. शेतात पिके होती. तलावांमुळे गारवा व सौंदर्यीकरण झाले होते. निसर्ग, शेती विषयी माहिती शेखर आनंदाने देत   होते. आमचे संपूर्ण कुटुंब व सहकारी आलेल्या पाहुण्यांचा," आपले घरचे / माहेरचे पाहुणे" मानून पाहुणचार करायला तत्पर होते. बोल बोल म्हणता सगुणा बागेने     "अतिथी देवो भव " ह्या तत्वाचा अंगीकार करून पाहुण्यांच्या मनात स्थान पटकावले.  शेतक्ऱ्याला प्रतिष्ठा मिळवून देणारी अशी केंद्रे इतर शेतकऱ्यांनीही सुरू करावीत म्हणून त्यांचे प्रयत्न सुरू ...

वैशिष्ठयपूर्ण नाते : कमळ पुष्प व समृद्धी यांचे. भाग 1

Image
थंडीच्या दिवसात भल्या पहाटे फिरायला जाणे फारच *सही* अनुभव असतो नाही? आज, लौकरच " झोप पुरी झालेल्या " नाती बरोबर मंदिरात निघाले.  मंदिर कमळांच्या तलावात आहे. धुक्यात लपेटलेल्या काचेमधून दत्त महाराजांचे नेहमी सारखे दुरूनच दर्शन झाले नाही.          “ आज्जी, आज बाप्पा कुठे लपून बसलाय ?” व लगेच …              “अबब ! केवढी ही कमळं !” नातीच्या निरीक्षणांनी , भगवंताच्या दर्शनासाठी आलेली मी सुद्धा कमळांच्या ताटव्यात हरवून गेले. पहाता पहाता सूर्याची कोवळी किरणे फुलांवर पडू लागली आणि, आमच्या नजरे समोर गुलाबी , पांढऱ्या कमळांना जाग आली. कळे उमलू लागले. ते विलक्षण सुगंधी, क्षण वेचताना प्रश्न आला ,        " आजी, हा काळा किडा कमळात काय करतोय?” तिच्या प्रश्नांचा हा भुंगा मला पार मेघदूतात घेऊन गेला. महाकवी कालिदास सांगतात  यक्ष हे कुबेराचे सेवक. हिमालय हा त्यांचा निवास. अशाच एका यक्षाला कुबेराने शंकराच्या पूजेसाठी सूर्योदयापूर्वी हजार कमळं आणून देण्याची जबाबदारी दिलेली असते. आधीच...

*पवित्र कमळ व ऐहिक संपंन्नता* भाग 2 :

Image
दैवी सौंदर्य लाभलेल्या कमळाला भारतीय संस्कृतीत अत्युच्च मानाचे स्थान दिले गेले आहे. भगवंताच्या सगुण रूपाचे वर्णन करतानाही ‘ मुखकमल, कमल वदन , कमलनयन, राजीव नेत्र , हृदय कमळ, कमलाकर, कमळप्रिय, असे केले गेले आहे. महालक्ष्मीचे तर ते निवासस्थानच आहे!!!   गोड्या पाण्याच्या जलाशयात कमळाचे खोड चिखलात सरपटत वाढते. दोन ते तीन फूट व्यासाची गोलसर पाने उंच काटेरी दांड्यावर तोललेली असतात. कमळाच्या पानांवर मेणासारखा पातळ थर असतो. शिवाय पानाच्या पृष्ठभागावर  असंख्य अतिसूक्ष्म उंचवटे असतात. त्यामुळे पानांवर पाणी पाणी पसरत नाही.  भल्या पहाटे सूक्ष्म दवबिंदूंचा थर शंकूच्या आकाराच्या पानभर पसरलेला  असतो . वाऱ्याचा हलका धक्का बसताच पाण्याच्या कणांचा एक छानसा पाणेरी मोती बनतो व अलगद घरंगळून मध्यभागी जमा होतो. मोत्याचे वजनाने तो ओघळूनही  जातो. पाण्या बरोबर धुलीकणही धुतले जातात.  उगीच नाही कमळाला अनासक्ती चा आदर्श म्हंटले जात.जन्म व वाढ दलदलीत का होईना पण , दैवी सौंदर्याचे वरदान मिळालेले असूनही  निर्लेप वृत्तीने सर्वांगांनी सर्...

SVT चे अग्निदिव्य ......

Image
विसाव्या शतकात डोंगरांवर वणवे क्वचितच लागलेले दिसत असत. परंतु एकविसाव्या शतकात वणव्यांचे व्याप, व्यापकता आणि दाहकता अती  झाली आहे. डिसेंबर जानेवारीतच डोंगर पेटू लागलेले आहेत.  पाऊस सुरु झाला की एरवी ओकेबोके असणारे डोंगरे एकाएकी  हिरवे होऊ लागतात. तिथली खुरटी झाडेझुडपे पानवतात. जोमाने फुटू लागतात. डोंगर  दऱ्यांत  ,कपारीत , वळचणींमध्ये, ओढ्यांच्या कडा कडांनीं, सर्वत्र गवत उगवते,  वाढते व श्रावणातल्या उन्हामध्ये सरसरून उंच होते . फुलते व पाऊस संपल्याबरोबर सुकते. चार महिन्यांचा जीवनक्रम!   डोंगर पिवळे पडतात. हे सुकलेले गवत-झाडांची गळलेली पाने, काडीकचरा अत्यंत स्फोटक असते. अशा ज्वालाग्राही जागेला मग वणवे लागतात.  वणवे  लागत नाहीत ते स्थानिक लोकांच्या क्षुल्लक स्वार्थासाठी लावले जातात. त्याची काही कारणे: 1. विनासायास जळाऊ लाकडे मिळवणे.  2. जंगलात मोहाची झाडे असतात. त्याच्या फुलांपासून मद्य निर्मिती केली जाते. ही फुले गोळा करणे सोपे जावे यासाठी.   3. डोंगरावरील ससे ,भेकर, रानडुक्कर किंवा इतर का...

भरारी....शेतकरी शास्त्रज्ञाची

Image
माणसाला दिवसातून तीन वेळा तरी निदान हवे तेवढे अन्न मिळायला हवे असेल तर त्यासाठी कुणीतरी शेतात राबणे गरजेचे आहे याची जाणीव जगातील काहींना आहे.             असे उन्हातानात शेतीचे एकसुरी काम करायला शेतकयांची नवीन पिढी नाखुष आहे . त्याचे जागतिक अन्न सुरक्षेवरही हया वस्तुस्थितीचा परिणाम होणार आहे.     सर्व जगात शेतकरी जमातीचे प्रश्न एकच आहेत व त्यावर उपाय शोधणारी सरकारी आधिकारी मंडळी  शहरात, वातानुकुलीत ऑफिसात बसून निर्णय घेतात  हे चित्र सुद्धा  जगभरात सारखेच.       इ. स. 2000 साली निर्माण झालेली  GFN ही संस्था शेतकऱ्यांचा आवाज आहे.  जगभरातील प्रगतशील शेतकरी धुंडून, त्यांच्यातील नेतृत्वाला पैलू पाडून त्यांच्या मार्फत कृषी विकास साधणे, अन्न सुरक्षा गाठणे असे व्यापक ध्येय त्यांचे आहे. श्री शेखर यांच्या नावे  KP.....कृषी पर्यटन, SRT..शून्य मशागत तंत्र, SVT....वणवे संरक्षण ,  SJT .... जलसाठ्यांचे शुद्धीकरण ही कालसिद्ध संशोधने आहेत. GFN ह्या संस्थेने श्री शेखर भडसावळे यांची भारतातील प्रगतिशील...

फुलपाखरांची झुंबरे

Image
पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागली की हळूहळू दिवसाला वळसा देऊन रात्र मोठी व्हायला लागते. थंडीची चाहूल लागली की बागेमध्ये हजारोंच्या संख्येने चिमुकले, उडणारे, रंगीबेरंगी पाहुणे येऊ लागतात. गर्द झाडी, उबदार हवामान आणि पुरेशी आर्द्रता असेच ठिकाण यांच्या आवडीचे.  येथेच न चुकता दरवर्षी वस्तीला येतत. "शू sssss शू ssssss आजीsss  बोलू नकोस हो......." लहानग्या ओठांचा चंबू करून त्यावर बोट ठेवून डोळे मोsठे करून  दबक्या आवाजात नातीची पहिली सूचना येते. दोन पावलं पुढे जाताच पायाखाली, पानगळीच्या वाळलेल्या पानांचा चर्रर्रर्रsss  आवाज येताच,  "आsजी ग, पाय नको ना वाजवू… फूफुले झोपलेत ना?"   क्षणभर  हरवले... "पाय नका वाजवू, कुणीही पाय नका वाजवू" ह्या नितांत सुंदर, भावविभोर अंगाई गीतात.  बागेत   लोम्बणाऱ्या फांद्यांवर, वेलींवर जागोजागी सुकलेल्या पानां सारखे  दिसणारे, पंख मिटलेल्या फुलपाखरांचे घोस चे घोस झुंबरांसारखे लटकलेले दिसु लागले. वाऱ्याची हलकी झुळूक आली आणि ‘बागेला रंगीत पंख फुटले’. पिवळ्या काळ्या रंगाच्या नाजूक...

व्यक्त - अव्यक्त ( Steam fog / steam smoke )

 आजही लेकरू लवकर उठले. “ मी पण येणार आहे  तुझ्याबरोबर. फिरायला आणि गंमती बघायला” स्वेटर , कानटोपी, मोजे  असा साज नाखुषीने लेवून बाईसाहेब तयार झाल्या. “ अग आजी, तलावातून धूर बघ  किती येतोय, बघ ना लवकर! ” तिच्या गंमतीमध्ये मी पण आनंदाने  सामील झाले. “पण असं का........ ?” प्रश्न  आलाच .  सूर्य जरासा कुठे डोकावू लागला होता.  चर्रर्र थंडीत तलावाच्या पृष्ठभागावरून  चंदेरी हलके ढग तरंगत वर येत होते.  प्रसन्नतेचा हा अविष्कार पाहताना पावले थबकलीच. ……...आणि कोवळ्या सूर्य प्रकाशात एक विलक्षण दृश्य दिसू लागले. तलावाने त्याच्या पृष्ठभागावर  धुक्याची हलकी शाल पांघरली होती . हलक्या वाऱ्यात घुक्यातील पाण्याचे  कण एकमेकांशी मस्ती करत होते . असं दिसत होतं की जणू तलावातून वाफाच  बाहेर पडत आहेत! ( Steam fog/ steam smoke) ' का बरं तलाव ,नदी यातून थंडीतल्या सकाळी सकाळी वाफा निघताना दिसतात? आत्ता हे पाणी गरम तर नाही ना ?' लगेच आठवले, 'साधारणपणे नोव्हेंबरमध्ये थंडीत पहाटे नदीवर कार्तिक  स्नानाला गेलं की पाणी छान उबदार असत...

जलाशयांना विळखा जलपर्णीचा! इलाज सगुणा जलसंवर्धन तंत्राचा ( SJT )!!

Image
पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, नाले, तलाव, सरोवरे फार छान दिसतात. त्यातच  कधी पूर येतो व पाण्याची सरमिसळ होते.            पावासाने  काढता पाय घेतला आणि हवामान उष्ण व्हायला  लागले की जलसाठ्यातील पाणी कमी होत जाते. नीट निरीक्षण केले तर आसपासच्या  जलाशयांमध्ये कुठेतरी कोपऱ्यात लहानसा हिरवा पुंजका तरंगताना दिसतो. महिन्याभरात वरील ठिकाणी फिरायला जावे, तर पाण्यावर  पसरलेला गच्च , गर्द हिरवा गालिचा पाहून धक्का बसून थक्क व्हायला होते. एवढ्या झपाट्याने वाढणारी ही  काय वनस्पती असावी? ही आहे जलपर्णी जलपर्णीचे इंग्रजी नाव आहे  Water hyacinth  ( Eichhornia crassipes )  जगभरातील अगणित  जलाशयांत, जलस्रोतांमध्ये  ह्या वनस्पतीने अतिक्रमण केले आहे. जलपर्णीच्या बेलगाम वाढीने  प्रगत देशांनाही त्राही भगवान करून सोडले आहे.               लहान मोठ्या जलाशयांवर दाट हिरवे  जाजम पसरल्यासारखी तरंगणारी जलपर्णी प्रथमदर्शनी फार छान दिसते.  गर्द हिरवी चकचक...