Posts

* खरेच का शरीर, जणू आत्म्याचे माध्यम आहे ? *

पर्यावरणा विषयी जाणून घेता घेता *मी व माझे शरीर*  ह्या विषयीही कुतूहल होतेच.  हे अर्जुना, *शरीराचे अस्तित्व केवळ काल्पनिक असून ते आत्म्याला प्रकट करण्याचे माध्यम आहे. * शरीराची वास्तविक सत्ता मानली जात नाही.  भगवंत अर्जुनाला,  युद्धामुळे आगामी होणाऱ्या मानवी विनाशाने वृथा शोकाकुल होऊ नकोस असा उपदेश करताना  निक्षून सांगतात. मला तरी भ. श्रीकृष्ण।नी सांगितलेले,    * शरीर हे , आत्म्याचे माध्यम * संकल्पना म्हणून कळायची पण अनुभव नसल्याने वळायची नाही.   अनेक साधू संतांना हा अनुभव आलेला आहे. महर्षी रमण यांना तर वयाच्या आठव्या वर्षीच आला.   अनुभव घेऊन समजून घेण्याची फार इच्छा होती. अनेक प्रश्न पडत होते.. आत्मा वेगळेपणाने कळायला हवा ना? तो कसा कळणार? त्याचे अस्तित्व कसे जाणून घ्यायचे?  त्या दृष्टीने व्यवहारातील उदाहरणांचा शोध मनात चालू होता.  या       पाठदुखीच्या ट्रीटमेंट साठी माझ्या   Physio therapist कडे गेले होते.   Swan position फार अवघड. पालथे पडून कंबरे पासून पुढचे  शरीर उचलायचे ...... ...

सिकाडा......एक भूमिगत साधक !!

Image
काल संध्याकाळी घरातील एका कोपऱ्यातून अचानक कर्कश आवाज आला….येतच राहिला म्हणून शोध घेतला.   “अरे ssssssss , हा तर सिकाडा !”.... शेखर  “ पुनरुत्पादनाचे ध्येय घेऊन सतरा वर्षांची तपश्चर्या करून बाहेर पडलाय तो !” ...... कस्तुऱी  सिकाडा अवतरतो तोच मुळी द्रुत गतीने ढोल ताशे बडवल्या सारख्य आवाजाने परिसर दणाणून टाकून! त्याची चाहूल लागली की वसंताला निरोप देऊन  ग्रीष्माच्या स्वागताची वेळ आली आहे असे  समजावे.  सिकाडाचे जीवनचक्र समजून घ्यायाला  मजेशीर आहे.   सिकाडाच्या  अळ्या ( nymphs ) पानगळीच्या वृक्षांखाली वाढतात. जातीनुसार त्या 13 ते 17 वर्षापर्यंत भूमिगत राहतात. ह्या काळात त्या जमिनीखाली बोगद्यांचे  जाळं तयार करतात. झाडाची कुजलेली मुळे व पालापाचोळाव वापरून  जमीन सुपीक व सच्छिद्र बनवतात.चार  वेळा कात टाकुन त्या मोठ्या होतात.   17 वर्षानंतर ग्रीष्माची चाहूल लागल्याबरोबर  उष्ण हवामानात  ह्या आळ्या एकदम, एकाच वेळी बाहेर पडतात व जवळील झाडाच्या खोडावर कूच करतात. आता त्यांचा जुना कोष पू...

मदनबाण

Image
मदनबाण साडेपाच वाजताही थोडे उजाडले असते मे महिन्यात. अंगणात पाऊल टाकायच्या आधीच मदनबाणाचा अनुपम सुगंध मन प्रफुल्लित करून टाकतो. अंगणातल्या बागेत मदनबाणाची लहान झाडे लावलेली आहेत. ती लहान झुडुपे आता कळ्यांनी आणि फुलांनी डवरली आहेत. भर उन्हाळ्यात, अंगाची काहिली होत असताना आपल्या शुभ्र फुलांनी आणि मोहक सुगंधाने दिवस उल्लासीत करणारा  मोगरा व त्याचाच चुलत भाऊ मदनबाण सध्या भाव खाऊन जात आहेत. …!   मदनबाण............ कुणी दिलंय हे समर्पक नाव? कोण मदन? तो फुलांचा बाण वापरतो?.   मदन म्हणजेच कामदेव.  कामदेवाचे धनुष्य व बाण दोन्ही पुष्पमय आहेत. रक्तकमल, नीलकमल, आम्रमंजरी, अशोकपुष्प व मोगरा ही पाच पुष्पे त्याचे पाच बाण आहेत व त्याचे धनुष्य उसाचे आहे.युवा मनात  प्रेम भावना रुजविण्यासाठी मदनाकडून ह्या पंचबाणांचा उपयोग केला जातो.  शुक  हे त्याचे वाहन आहे . दक्षाची अत्यंत रूपवती कन्या रति त्याची पत्नी आहे असे वर्णन आहे.  भगवान  शंकर, सतीच्या दक्षयज्ञातील  मृत्यूने विरक्त झाले. समाधिस्थ झाले. त्याला युगानुयुगे लोटली .   इथे पृथ्वीवर ता...

लटकणाऱ्या सुंदर फुलांच्या माळांचा गोड्या पाण्याकाठचा वृक्ष: नेवर

Image
लटकणाऱ्या सुंदर फुलांच्या माळांचा गोड्या पाण्याकाठचा वृक्ष:  नेवर   “ आई, होळीचे रंग संपले नाहीत का इथले अजून?” फिरायला गेलेले असताना तलावावर  अचानक  थबकून पाण्याच्या  काठावरील पृष्ठभागावर झगझगीत लाल - गुलाबी  रंगाच्या कार्पेट कडे  पाहून माझा नातू आर्चितने , कस्तुरीला विचारले. “ तलावाच्या काठच्या  झाडावर लटकणाऱ्या फुलांच्या खूप  माळा होत्या का गं ? ....मी       “ नाही पाहिलं  गं ?”  ....कस्तुरी  “ब ss रं,  मग तिथे तुम्हाला काही वेगळा सुगंध आला का ?”... “हो ना ? मग, नेवर फुललेली दिसतेय”......मी. नेवर/ तिवर  ( Barrigtonia acutangula. Family: Lecythidaceae.)  म्हणजे गोड्या पाण्याचं मँग्रोव्ह.  हा वृक्ष आयुर्वेदाच्या दृष्टीने औषधी आहे. संस्कृत मध्ये हिज्जा तर धात्रिफल किंवा नर्स चे फळ असेही याचे नाव आहे.  झाडाची  साल, पाने, फळे व मुळे औषधासाठी वापरतात. विशेष: नेवरच्या झाडाची साल मासेमारीसाठी वापरली जाते. सालापासून मासेमारीसाठी...

आठव..आईचा

माझी, संजीव व  धनंजयची आई,  श्रीम. रोहिणी रमाकांत बेंद्रे आज  87 वर्षांची झाली असती. सतत हसतमुख, बेताची उंची, लख्ख गोरा रंग, मध्यम अंगकाठी , कोणत्याही कामात पुढाकार घेणारी, आपली मते परखडपणे मांडणारी,शाळेतील मुलांना व मैत्रिणींना घेऊन दूरदूर प्रवास करणारी....चुकल्यावर रागावणारी.... लहानपणापासूनची तिची खूप रूपं आठवत राहतात.  आमची आई साक्षोपाने सगळे सण साजरे करायची. होळी, गुढीपाडवा,  अक्षयतृतीय, श्रावणी शुक्रवारचे हळदी कुंकू, नारळीपौर्णिमा - कोजागिरी पौर्णिमा, पोळा, गणपती,  नवरात्र दिवाळी, दसरा, संक्रांतीचे हळदीकुंकू....सगळं कसं , गणगोतांच्या गराड्यात पक्वान्नांसह, नीटनेटके कपडे लेवून साग्रसंगीत... व्हायलाच हव… “त्याशिवाय तुम्हाला कळणार कसे आपले सण?”  लग्नाला कुणाकडे जाताना नवीन, टोचणारे कपडे घालायचा मला नेहमी कंटाळा यायचा.  “  ‘आपण येऊन आमच्या कार्यक्रमास शोभा आणावी’ असे लिहिलेले असते ना पत्रिकेत? मग  त्यांच्या समारंभासाठी आपण चांगले नीट कपडे नको का घालायला?" ह्या बिनतोड प्रश्नावर काय उत्तर देणार? पहाटे चार ते रात्री अकरा...सतत कामात व्यग्...

आभाळ-फुलांचे विलक्षण झाड

Image
आभाळ-फुलांचे विलक्षण झाड  आज चांदण्यांच्या फुलांचे झाड पाहिलं. आमची लेक टेकडीवर राहते. घराचे नाव वृंदावन. रात्री तिच्या अंगणामध्ये दिवे बंद करून नातवंडं ग्रहांची, आकाशाची ओळख करून घेत होती. तेवढ्यात बकुळीचा चिरपरिचित मंद सुगंध वाऱ्याबरोबर आला. अचानक केतकी म्हणाली, “आई, तुला चांदण्यांचं  झाड पाहायचंय?”  ही कल्पनाच इतकी भारी, मोहक होती, की लगेच ,  " होss चल ना" उत्तर आले. तिच्या अंगणात एक मोठं वेहेळयाचं  ( बेहेडा ) झाड आहे. वेहेळा ( Terminalia bellirica) पानझडी. आत्ता संपूर्ण निष्पर्ण. फुलांच्या आगमनाची पूर्वतयारीच ती. वेहळ्याचं झाड फार  देखण. सरळ, उंच खोडाला  काटकोनात तर जमिनीला समांतर जाणाऱ्या मुख्य फांद्या, त्यांना फुटलेल्या लहान लहान उपफांद्या ,…. त्यांच्या टोकाशी टरारलेल्या कळ्या... ! काहीतरी छान पाहायला मिळणार आहे ह्याची कल्पना आल्याने मुलं नातवंडांचे कान टवकारले.  कोरोनाच्या लॉक डाऊन मुळे रस्ताही वाहता नव्हता. कशाही निमित्त भोंगे वाजत नव्हते. नुसती  निखळ शांतता. खेड्यात, शिवाय उंचावर असल्याने प्रकाशाचे प्रदूषणही नव्हते. विनायकी चतुर्थीची...

पृथ्वी : एक महाकाय सजीव

Image
पृथ्वी  :  एक महाकाय सजीव आपली पृथ्वी हा सुर्यमालेमधला सूर्यापासून तिसरा ग्रह. पृथ्वीच्या अलीकडचे बुध व शुक्र  सूर्याच्या जवळ असल्याने अतिशय तप्त … अनुक्रमे सरासरी  167 व  462 डिग्री से. तापमानाचे.  पृथ्वीच्या पलिकडचे गुरु, शनी पासून प्लूटो पर्यंतचे सहा ग्रह अत्यंत शीत: सरासरी   - 110 ते  - 225 डिग्री सेल्सिअस राखणारे.  खरे तर पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर पाहता तिचे सरासरी तापमान  53 डिग्री से. असायला हवे होते. पण प्रत्यक्षात ते 13 डिग्री से. सरासरी आहे.   पृथ्वी हा ग्रह सजीवांच्या  जीवनासाठी परिपूर्ण आहे ; हा योगायोग असूच  शकत नाही असे ब्रिटिश शास्त्रज्ञ प्रो. जेम्स  लव्हलॉक  यांना अमेरिकेतील नासा संस्थेमध्ये मंगळावरील वातावरणाचा जीवसृष्टी संदर्भात अभ्यास करताना जाणवले.  सखोल अभ्यास व संशोधनानंतर पृथ्वी ही एक महाकाय सजीव असल्या  विषयीची  गाया  संकल्पना त्यांनी 1970 च्या दशकात  मांडली. गाया ही  ग्रीकांची भू देवता.  गाया संकल्पनेनुसार ,  “ पृथ्वीवरच्या सर्व सजीवांची...

इको ब्रिकस्: महिला फिनच्या निमित्ताने आपण हे करूया का?

Image
महिला दिनाच्या निमित्ताने एक कल्पना शेअर करायची आहे. फार सोप्पी आणि सहज जमण्यासारखी आहे सगळ्यांना. आपण स्त्रिया नेहमी अष्टभुजे प्रमाणे Multi tasking  करत राहतो." सुपर वूमन सिमड्रोम " ने  पछाडलेले असतो म्हणाना . त्यातल्या पैकीच एक चुटकी सरशी करता येण्यासारखी एक ' Eco friendly ' ऍक्टिव्हिटी आहे. भयपटात दाखवल्या सारखे , प्लॅटिक जमीन, नद्या- नाले, महासगरांना दर क्षणाला पादाक्रांत करताना आपण ऐकतोय, चकित होऊन पहातोय.  आपला जास्त संबंध येतो प्लास्टिक पिशव्या व  खाऊच्या रॅपरशी . आकारमानाने मोठे पण वजनाने नगण्य असे हे 'महाभूत'  बिसलेरी किंवा तत्सम बाटलीत अगदी सहज बंद होते. इतकेच नाही तर त्यापासून उत्तमोत्तम वस्तूही तयार करता येतात. हा  विषय मला माझ्या लेकीने पटवून दिला.  ही नवीन idea  आहे.’ इको ब्रिक ' किंवा ' पर्यावरण स्नेही विटा ’  तयार करणेची . बिसलेरी किंवा कोणत्याही  प्लास्टिकच्या बाटली मध्ये दिवसभरात निर्माण होणारे सर्व प्लास्टिकचे तुकडे, पिशव्या ठासुन भरायचे. साधारण आठवडा पंधरवड्याने  ती बाटली विटे सारखे मजबूत, घट्ट बनते. अशा अनेक बाट...

दरवळला परिमळ सारा

Image
खरंतर फार वाजले नव्हते. पण सूर्य कलला होता. काळोख दाटू लागला होता. पक्ष्यांचा आपल्या  घरट्यांकडे परतीचा प्रवास सुरु झाला होता.   संध्याकाळी उशिरा  नदीवरून घाईने परतताना घराजवळ अचानक पावलं थबकली.   आसमंतात सर्वदूर मंद, मोहक, सुगंधाची पखरण झाली होती. गुलाब, जाई, जुई, मोगरा, सोनटक्का, चाफा, बूच, बकुळ  ह्यांपेक्षा वेगळा, अलवार सुगंध …… मन घरी ओढ घेत होतं, पण पाय मात्र जागचे हलायला तयार नव्हते ह्या लपलेल्या सुवसाला कुठे शोधू असं होऊन गेलं. आजी ssss आजीssssss ग!  थांबायचे का आपल्याला 'पपम' जवळ? पपम..... पपनसाचे नाव आभाने काढल्याबरोबर सुगंधाचे कोडे उलगडले. झाड दिसत नव्हते पण सुगंध आपली ओळख सांगत होता. पपनस फुलावर आलाय वाटतं!!! हिवाळ्याचे उत्तरार्धात वातावरण थंड पण कोरडे असते. यावेळी पपनस फुलतात..... हो तेच ते फळ जे  गणपती घरी आले की वाट्टेल ती किंमत देऊन बाप्पासाठी घेऊन येतो. हे झाड मूळचे मलेशियातील. भारतात चांगले रुळले. चुरल्यावर प्रसन्न सुगंध येणारी गर्द हिरवी गोल मोठी पाने... . पांढऱ्या रंगाचे, मंद सुगंधी फुलांचे घो...

सुख आणि सौख्य

माझी चिमुरडी नात आहे दोन वर्षांची . फार गोड  आहे.  तिला लपाछपी, पकडपकडी खेळायची असते. पुस्तकातील चित्रे जाणून घ्यायची असतात. वही पेन घेऊन अभ्यास करायचा असतो. देवाची पूजाही बरोबरीने करायची असते. जमिनीवर बसले असता पाठीमागून तिची बाळमिठी गळ्याला बसली की मन आनंदाने भरून येते. सुख सुख म्हणतात ते म्हणजे हेच असं वाटत असतानाच..…...आई, बाबा, आबा पैकी कुणी बाहेर निघाले की हिची मिठी लगेच सुटते.  " मना पन ने ना।    मना यायचंय   "  म्हणत  आपले बूट शोधू लागते. क्षणा पूर्वी सुखसागरात विहार करणारे मन म्हणू लागले........... जागी हो बाई , जागी हो .  लक्षात आलं की हा अनुभव फक्त माझा नाहीय.   तीन चार महिन्यांच्या बाळालाही  आईच्या उबदार कुशीतूनही  " भुर्रर्रर्र " ची ओढ असतेच.  आपले सुखाचे स्वरूप बदलतेच राहते! समर्थ निक्षून सांगताहेत..... विषय जनीत सुखे सौख्य होणार नाही. काय आहे सुख ?  शब्द स्पर्शादी विषयां पासून तात्पुरते मिळालेले  ते सुख . पण त्याच्या भ्रमंतीत शीण आहे. सौख्य ... विषयांशिवाय  माझ्यातच मला सापडलेले कायम...

महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन महासंघ सहकारी मर्यादित. ( MART )

मार्ट ह्या संस्थेने सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने काल कृषिरत्न श्री. चंद्रशेखर भडसावळे यांस " कृषी पर्यटनाचे जनक " Father of Agrotourism ह्या सन्मानाने विभूषित केले. प्रवास सगुणा बागेचा सगुणाबागेत कृषी पर्यटन 1985 पासून सुरू झाले . खरे तर कृषी पर्यटन ह्या शब्दाचा जन्मही इथेच झाला.       साप बघायला येणाऱ्या काही पाहुण्यांनी, " आम्ही इथे दिवसभर राहू का?  जेवायची सोय होईल  का? " असे विचारल्यावर, " हो, नक्की "  असे सांगून साधीशीच सोय मनापासून आपुलकीने केली. इथली झाडे तोवर डेरेदार होऊ लागली होती. शेतात पिके होती. तलावांमुळे गारवा व सौंदर्यीकरण झाले होते. निसर्ग, शेती विषयी माहिती शेखर आनंदाने देत   होते. आमचे संपूर्ण कुटुंब व सहकारी आलेल्या पाहुण्यांचा," आपले घरचे / माहेरचे पाहुणे" मानून पाहुणचार करायला तत्पर होते. बोल बोल म्हणता सगुणा बागेने     "अतिथी देवो भव " ह्या तत्वाचा अंगीकार करून पाहुण्यांच्या मनात स्थान पटकावले.  शेतक्ऱ्याला प्रतिष्ठा मिळवून देणारी अशी केंद्रे इतर शेतकऱ्यांनीही सुरू करावीत म्हणून त्यांचे प्रयत्न सुरू ...

वैशिष्ठयपूर्ण नाते : कमळ पुष्प व समृद्धी यांचे. भाग 1

Image
थंडीच्या दिवसात भल्या पहाटे फिरायला जाणे फारच *सही* अनुभव असतो नाही? आज, लौकरच " झोप पुरी झालेल्या " नाती बरोबर मंदिरात निघाले.  मंदिर कमळांच्या तलावात आहे. धुक्यात लपेटलेल्या काचेमधून दत्त महाराजांचे नेहमी सारखे दुरूनच दर्शन झाले नाही.          “ आज्जी, आज बाप्पा कुठे लपून बसलाय ?” व लगेच …              “अबब ! केवढी ही कमळं !” नातीच्या निरीक्षणांनी , भगवंताच्या दर्शनासाठी आलेली मी सुद्धा कमळांच्या ताटव्यात हरवून गेले. पहाता पहाता सूर्याची कोवळी किरणे फुलांवर पडू लागली आणि, आमच्या नजरे समोर गुलाबी , पांढऱ्या कमळांना जाग आली. कळे उमलू लागले. ते विलक्षण सुगंधी, क्षण वेचताना प्रश्न आला ,        " आजी, हा काळा किडा कमळात काय करतोय?” तिच्या प्रश्नांचा हा भुंगा मला पार मेघदूतात घेऊन गेला. महाकवी कालिदास सांगतात  यक्ष हे कुबेराचे सेवक. हिमालय हा त्यांचा निवास. अशाच एका यक्षाला कुबेराने शंकराच्या पूजेसाठी सूर्योदयापूर्वी हजार कमळं आणून देण्याची जबाबदारी दिलेली असते. आधीच...

*पवित्र कमळ व ऐहिक संपंन्नता* भाग 2 :

Image
दैवी सौंदर्य लाभलेल्या कमळाला भारतीय संस्कृतीत अत्युच्च मानाचे स्थान दिले गेले आहे. भगवंताच्या सगुण रूपाचे वर्णन करतानाही ‘ मुखकमल, कमल वदन , कमलनयन, राजीव नेत्र , हृदय कमळ, कमलाकर, कमळप्रिय, असे केले गेले आहे. महालक्ष्मीचे तर ते निवासस्थानच आहे!!!   गोड्या पाण्याच्या जलाशयात कमळाचे खोड चिखलात सरपटत वाढते. दोन ते तीन फूट व्यासाची गोलसर पाने उंच काटेरी दांड्यावर तोललेली असतात. कमळाच्या पानांवर मेणासारखा पातळ थर असतो. शिवाय पानाच्या पृष्ठभागावर  असंख्य अतिसूक्ष्म उंचवटे असतात. त्यामुळे पानांवर पाणी पाणी पसरत नाही.  भल्या पहाटे सूक्ष्म दवबिंदूंचा थर शंकूच्या आकाराच्या पानभर पसरलेला  असतो . वाऱ्याचा हलका धक्का बसताच पाण्याच्या कणांचा एक छानसा पाणेरी मोती बनतो व अलगद घरंगळून मध्यभागी जमा होतो. मोत्याचे वजनाने तो ओघळूनही  जातो. पाण्या बरोबर धुलीकणही धुतले जातात.  उगीच नाही कमळाला अनासक्ती चा आदर्श म्हंटले जात.जन्म व वाढ दलदलीत का होईना पण , दैवी सौंदर्याचे वरदान मिळालेले असूनही  निर्लेप वृत्तीने सर्वांगांनी सर्...

SVT चे अग्निदिव्य ......

Image
विसाव्या शतकात डोंगरांवर वणवे क्वचितच लागलेले दिसत असत. परंतु एकविसाव्या शतकात वणव्यांचे व्याप, व्यापकता आणि दाहकता अती  झाली आहे. डिसेंबर जानेवारीतच डोंगर पेटू लागलेले आहेत.  पाऊस सुरु झाला की एरवी ओकेबोके असणारे डोंगरे एकाएकी  हिरवे होऊ लागतात. तिथली खुरटी झाडेझुडपे पानवतात. जोमाने फुटू लागतात. डोंगर  दऱ्यांत  ,कपारीत , वळचणींमध्ये, ओढ्यांच्या कडा कडांनीं, सर्वत्र गवत उगवते,  वाढते व श्रावणातल्या उन्हामध्ये सरसरून उंच होते . फुलते व पाऊस संपल्याबरोबर सुकते. चार महिन्यांचा जीवनक्रम!   डोंगर पिवळे पडतात. हे सुकलेले गवत-झाडांची गळलेली पाने, काडीकचरा अत्यंत स्फोटक असते. अशा ज्वालाग्राही जागेला मग वणवे लागतात.  वणवे  लागत नाहीत ते स्थानिक लोकांच्या क्षुल्लक स्वार्थासाठी लावले जातात. त्याची काही कारणे: 1. विनासायास जळाऊ लाकडे मिळवणे.  2. जंगलात मोहाची झाडे असतात. त्याच्या फुलांपासून मद्य निर्मिती केली जाते. ही फुले गोळा करणे सोपे जावे यासाठी.   3. डोंगरावरील ससे ,भेकर, रानडुक्कर किंवा इतर का...

भरारी....शेतकरी शास्त्रज्ञाची

Image
माणसाला दिवसातून तीन वेळा तरी निदान हवे तेवढे अन्न मिळायला हवे असेल तर त्यासाठी कुणीतरी शेतात राबणे गरजेचे आहे याची जाणीव जगातील काहींना आहे.             असे उन्हातानात शेतीचे एकसुरी काम करायला शेतकयांची नवीन पिढी नाखुष आहे . त्याचे जागतिक अन्न सुरक्षेवरही हया वस्तुस्थितीचा परिणाम होणार आहे.     सर्व जगात शेतकरी जमातीचे प्रश्न एकच आहेत व त्यावर उपाय शोधणारी सरकारी आधिकारी मंडळी  शहरात, वातानुकुलीत ऑफिसात बसून निर्णय घेतात  हे चित्र सुद्धा  जगभरात सारखेच.       इ. स. 2000 साली निर्माण झालेली  GFN ही संस्था शेतकऱ्यांचा आवाज आहे.  जगभरातील प्रगतशील शेतकरी धुंडून, त्यांच्यातील नेतृत्वाला पैलू पाडून त्यांच्या मार्फत कृषी विकास साधणे, अन्न सुरक्षा गाठणे असे व्यापक ध्येय त्यांचे आहे. श्री शेखर यांच्या नावे  KP.....कृषी पर्यटन, SRT..शून्य मशागत तंत्र, SVT....वणवे संरक्षण ,  SJT .... जलसाठ्यांचे शुद्धीकरण ही कालसिद्ध संशोधने आहेत. GFN ह्या संस्थेने श्री शेखर भडसावळे यांची भारतातील प्रगतिशील...

फुलपाखरांची झुंबरे

Image
पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागली की हळूहळू दिवसाला वळसा देऊन रात्र मोठी व्हायला लागते. थंडीची चाहूल लागली की बागेमध्ये हजारोंच्या संख्येने चिमुकले, उडणारे, रंगीबेरंगी पाहुणे येऊ लागतात. गर्द झाडी, उबदार हवामान आणि पुरेशी आर्द्रता असेच ठिकाण यांच्या आवडीचे.  येथेच न चुकता दरवर्षी वस्तीला येतत. "शू sssss शू ssssss आजीsss  बोलू नकोस हो......." लहानग्या ओठांचा चंबू करून त्यावर बोट ठेवून डोळे मोsठे करून  दबक्या आवाजात नातीची पहिली सूचना येते. दोन पावलं पुढे जाताच पायाखाली, पानगळीच्या वाळलेल्या पानांचा चर्रर्रर्रsss  आवाज येताच,  "आsजी ग, पाय नको ना वाजवू… फूफुले झोपलेत ना?"   क्षणभर  हरवले... "पाय नका वाजवू, कुणीही पाय नका वाजवू" ह्या नितांत सुंदर, भावविभोर अंगाई गीतात.  बागेत   लोम्बणाऱ्या फांद्यांवर, वेलींवर जागोजागी सुकलेल्या पानां सारखे  दिसणारे, पंख मिटलेल्या फुलपाखरांचे घोस चे घोस झुंबरांसारखे लटकलेले दिसु लागले. वाऱ्याची हलकी झुळूक आली आणि ‘बागेला रंगीत पंख फुटले’. पिवळ्या काळ्या रंगाच्या नाजूक...

व्यक्त - अव्यक्त ( Steam fog / steam smoke )

 आजही लेकरू लवकर उठले. “ मी पण येणार आहे  तुझ्याबरोबर. फिरायला आणि गंमती बघायला” स्वेटर , कानटोपी, मोजे  असा साज नाखुषीने लेवून बाईसाहेब तयार झाल्या. “ अग आजी, तलावातून धूर बघ  किती येतोय, बघ ना लवकर! ” तिच्या गंमतीमध्ये मी पण आनंदाने  सामील झाले. “पण असं का........ ?” प्रश्न  आलाच .  सूर्य जरासा कुठे डोकावू लागला होता.  चर्रर्र थंडीत तलावाच्या पृष्ठभागावरून  चंदेरी हलके ढग तरंगत वर येत होते.  प्रसन्नतेचा हा अविष्कार पाहताना पावले थबकलीच. ……...आणि कोवळ्या सूर्य प्रकाशात एक विलक्षण दृश्य दिसू लागले. तलावाने त्याच्या पृष्ठभागावर  धुक्याची हलकी शाल पांघरली होती . हलक्या वाऱ्यात घुक्यातील पाण्याचे  कण एकमेकांशी मस्ती करत होते . असं दिसत होतं की जणू तलावातून वाफाच  बाहेर पडत आहेत! ( Steam fog/ steam smoke) ' का बरं तलाव ,नदी यातून थंडीतल्या सकाळी सकाळी वाफा निघताना दिसतात? आत्ता हे पाणी गरम तर नाही ना ?' लगेच आठवले, 'साधारणपणे नोव्हेंबरमध्ये थंडीत पहाटे नदीवर कार्तिक  स्नानाला गेलं की पाणी छान उबदार असत...

जलाशयांना विळखा जलपर्णीचा! इलाज सगुणा जलसंवर्धन तंत्राचा ( SJT )!!

Image
पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या, नाले, तलाव, सरोवरे फार छान दिसतात. त्यातच  कधी पूर येतो व पाण्याची सरमिसळ होते.            पावासाने  काढता पाय घेतला आणि हवामान उष्ण व्हायला  लागले की जलसाठ्यातील पाणी कमी होत जाते. नीट निरीक्षण केले तर आसपासच्या  जलाशयांमध्ये कुठेतरी कोपऱ्यात लहानसा हिरवा पुंजका तरंगताना दिसतो. महिन्याभरात वरील ठिकाणी फिरायला जावे, तर पाण्यावर  पसरलेला गच्च , गर्द हिरवा गालिचा पाहून धक्का बसून थक्क व्हायला होते. एवढ्या झपाट्याने वाढणारी ही  काय वनस्पती असावी? ही आहे जलपर्णी जलपर्णीचे इंग्रजी नाव आहे  Water hyacinth  ( Eichhornia crassipes )  जगभरातील अगणित  जलाशयांत, जलस्रोतांमध्ये  ह्या वनस्पतीने अतिक्रमण केले आहे. जलपर्णीच्या बेलगाम वाढीने  प्रगत देशांनाही त्राही भगवान करून सोडले आहे.               लहान मोठ्या जलाशयांवर दाट हिरवे  जाजम पसरल्यासारखी तरंगणारी जलपर्णी प्रथमदर्शनी फार छान दिसते.  गर्द हिरवी चकचक...

आपले अस्तित्त्व व कर्बाचे स्थिरीकरण

परिस्थितीशी जुळवून घेण्याच्या बाबतीत बेडकाची फार छान विज्ञान कथा  आहे. समजा एखाद्या बेडकाला अचानक गरम पाण्याच्या टबात टाकले तर तो उडी मारून बाहेर येईल.  हो , नाही का? परंतु बेडकाला जर  सामान्य तापमानाच्या पाण्याच्या टबात  सोडले तर तो तेथेच मजेत राहील.. आता  टबातील पाण्याचे तापमान हळूहळू वाढवले तर तो प्रथम थोडा अस्वस्थ होईल . पण बदलत्या तापमानाशी तो जुळवून घेईल. कारण सभोवतालच्या तापमानानुसार शारीरिक तापमान राखणे ही त्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. पाण्याचे तापमान वाढता वाढता एक वेळ अशी येईल की त्याला आता पाण्यात राहणेही शक्य होणार  नाही. शरीरातील सर्व शक्ती बाह्य बदलाशी जुळवून घेण्यात खर्च झाल्याने जास्त  गरम पाण्यातून उडी मारून बाहेर  पडण्याचे  त्राणही त्याच्यात शिल्लक राहणार नाहीत. तेथेच त्या गरम पाण्यात त्याला आपले प्राण गमवावे लागतील. याला म्हणतात  “Boiling frog Syndrome”. खरंतर  तो बेडूक व बदलत्या प्रदूषित वातावरणात रुळू  लागलेले आपण यात काहीही फारसा फरक नाही. पूर, त्सुनामी, गारपीट, चक्रीवादळे, अवकाळी पाऊस, भूक...

महान भिंतीची अद्भुत कहाणी

Image
The Great wall of china जगातले  मानवनिर्मित आश्चर्य म्हणून गौरवली गेलेली   चीनची *ग्रेट वॉल* इतकी ती उंच आहे की तिथे केबलकारने पोहचावे लागते.                             चिनी ड्रॅगन सारखी, दऱ्या खोरे  - वाळवंट - पर्वतराजींवर ती ऐसपैस पसरली आहे         म्युटीयांयू  वॉल ,महान भिंतीच्या अनेक विभागांपैकी एक  हा बिजींगच्या उत्तरेला आहे .       त्या अवाढव्य , प्रशस्त व   नेटक्या भिंतीवर निस्तब्ध होऊन तिचे महाकाय रूप व परिसराचे सौंदर्य मनात व डोळ्यात साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत असताना ,  कस्तुरी उद्गारली,        " खरेच ग आई, The Great  wall is simply great!             No wonder the  whole world admires it!" मलाही आठवलं, शालेय वयात पर्ल  बक ह्या जगप्रसिद्ध लेखिकेची * The Good Earth * ही कादंबरी  वाचल्या पासून चीन विषयी आकर्षण होतेच. ग्रेट वॉल वर गेल्यावर ...